E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
फेसटाइम कॉलमुळे फसला नीलेश चव्हाण
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील फरारी आरोपी नीलेश चव्हाण याला नुकतीच नेपाळ सीमेवरून अटक केली होती. पोलिसांची नजर चुकवण्यासाठी त्याने अतिशय थंड डोक्याने आणि नियोजनपूर्वक पलायनाची आखणी केली होती. मात्र, आयफोनवरील फेसटाइम कॉल त्याच्या अडचणीचे कारण ठरला. लॉजमध्ये झोपलेल्या अवस्थेत त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या होत्या
वैष्णवी हगवणे प्रकरणात नाव आल्यापासून नीलेश चव्हाण पोलिसांना चकवा देत होता. गुन्हा घडल्यानंतर त्याने पळून जाण्याची योजना आखली होती. आधी एका मैत्रिणीशी संपर्क साधून तिला सोबत घेऊन त्याने दिल्ली गाठली. काही काळानंतर तिला परत पाठविले आणि स्वतः नेपाळकडे कूच केले. पोलिसांना लोकेशन सापडू नये, यासाठी त्याने कुठेही बँक व्यवहार केला नाही, एटीएम वापरले नाही, फक्त रोख व्यवहार केले. सीसीटीव्ही नसलेल्या दुकानातून खरेदी केली. सिम कार्डही खरेदी केले होते.पोलिसांनी त्याच्या मैत्रिणीच्या मोबाइलचा तांत्रिक तपास केला आणि विविध क्रमांक ट्रॅक केले.
पण, नीलेशाने कोणालाही थेट संपर्क केला नव्हता. त्यामुळे तपासात अडथळे येत होते. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी प्रकरणात लक्ष घातले. गुन्हे शाखेची सर्व पथके, सायबर युनिट आणि खबर्यांचे नेटवर्क कामाला लावले होते. दरम्यान, नीलेशने पुण्यातील काही व्यक्तींना ‘अॅपल फेसटाइम’ कॉल केला. मात्र, याच कॉलमुळे पोलिसांचा सायबर विभाग अलर्ट झाला. त्या कॉलवरून फोनचा आयपी अॅड्रेस शोधून काढला. तेव्हा तो नेपाळमध्ये असल्याचे उघड झाले.. पोलिस आयुक्त चौबे यांनी नेपाळमधील पोलिस अधिकार्यांशी संपर्क साधला. त्यातून एका स्थानिक चालकाचा नंबर मिळाला. त्या क्रमांकाचे विश्लेेषण केल्यानंतर आणखी एक संशयित मोबाइल नंबर हाती लागला, जो नीलेशच्या नवीन सिम कार्डचा होता. त्यावरून पोलिसांकडे अचूक लोकेशन आले. नेपाळमधील लॉजमध्ये झोपलेल्या नीलेशला पकडले. पोलिसांनी त्याला गाडीत बसवून थेट बावधन येथे आणले. दरम्यान नीलेशच्या नातेवाइकांवर, मित्रांवर आणि संपर्कातील प्रत्येक व्यक्तीवर पोलिासांची नजर होती. पोलिसांना खात्री होती की, तो एखादी चूक करेल आणि त्या एका चुकीचा फायदा त्यांनी घेतला.
वस्ताद एक डाव राखून ठेवतो..
पुणे शहर पोलिस दलातील एका उच्चपदस्थ अधिकार्याच्या बहिणीशी नीलेश चव्हाणने विवाह केला होता. तसेच, पोलिस अधिकार्यांमध्ये त्याची नेहमी उठबस देखील होती. त्यामुळे त्याला पोलिस दलाच्या कार्यपद्धतीची चांगलीच माहिती होती. पोलिसांची चौकशी, शोध प्रक्रिया आणि तपास यंत्रणा कशी कार्य करते, हे त्याने जवळून पाहिले होते. या अनुभवाचा गैरफायदा घेत त्याने अतिशय थंड डोक्याने पलायनाची आखणी केली होती. मात्र, ‘वस्ताद एक डाव राखून ठेवतो’ या उक्तीप्रमाणे पोलिसांनी अधिक चाणाक्षपणे काम करीत त्याचा डाव हाणून पाडला आणि वेळीच त्याला अटक केली.
Related
Articles
पॅट कमिन्सने टिपले ६ महत्त्वपूर्ण बळी
13 Jun 2025
दक्षिण आफ्रिकेने जिंकला विश्वचषक
15 Jun 2025
विमान सुरक्षेचाच कोळसा...
13 Jun 2025
वाहनांना एचएसआरपी बसवून घ्या
13 Jun 2025
येरवड्यात सांडपाणी रस्त्यावर; आरोग्याचा प्रश्न गंभीर
15 Jun 2025
श्रद्धा, अंधश्रद्धा, भास आणि भीतीचा लपंडाव
11 Jun 2025
पॅट कमिन्सने टिपले ६ महत्त्वपूर्ण बळी
13 Jun 2025
दक्षिण आफ्रिकेने जिंकला विश्वचषक
15 Jun 2025
विमान सुरक्षेचाच कोळसा...
13 Jun 2025
वाहनांना एचएसआरपी बसवून घ्या
13 Jun 2025
येरवड्यात सांडपाणी रस्त्यावर; आरोग्याचा प्रश्न गंभीर
15 Jun 2025
श्रद्धा, अंधश्रद्धा, भास आणि भीतीचा लपंडाव
11 Jun 2025
पॅट कमिन्सने टिपले ६ महत्त्वपूर्ण बळी
13 Jun 2025
दक्षिण आफ्रिकेने जिंकला विश्वचषक
15 Jun 2025
विमान सुरक्षेचाच कोळसा...
13 Jun 2025
वाहनांना एचएसआरपी बसवून घ्या
13 Jun 2025
येरवड्यात सांडपाणी रस्त्यावर; आरोग्याचा प्रश्न गंभीर
15 Jun 2025
श्रद्धा, अंधश्रद्धा, भास आणि भीतीचा लपंडाव
11 Jun 2025
पॅट कमिन्सने टिपले ६ महत्त्वपूर्ण बळी
13 Jun 2025
दक्षिण आफ्रिकेने जिंकला विश्वचषक
15 Jun 2025
विमान सुरक्षेचाच कोळसा...
13 Jun 2025
वाहनांना एचएसआरपी बसवून घ्या
13 Jun 2025
येरवड्यात सांडपाणी रस्त्यावर; आरोग्याचा प्रश्न गंभीर
15 Jun 2025
श्रद्धा, अंधश्रद्धा, भास आणि भीतीचा लपंडाव
11 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक